भोर: तालुक्यातील राजगड पोलिस स्टेशन मध्ये विवाहित महिलेची आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आळंदे विवाहित महिलेला तिच्या पतीने मारहाण करून विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. मृत महिलेच्या बहिणीने पती दिपक राजेशिर्के यांच्यावर घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यानुसार दिपक यांच्यासह सासू व दोन नंदा याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरी राजेशिर्के यांनी शुक्रवारी सकाळी 11.30 च्या सुमारास आपल्या बहिणीला फोन करून पती दिपक यांच्याकडून मारहाणीची तक्रार केली होती.थोड्याच वेळात, दिपक यांनी मृत महिलांच्या बहिणीला फोन करून धमकी दिली आणि 10 मिनिटांत मृत महिलेला पुण्यात फेकून देण्याची धमकी दिली.दुपारी 4.30 च्या सुमारास, मृत महिलांची आई जयश्री यांनी त्यांना फोन केला असता, मृत महिलेच्या सासरच्या लोकांनी विहिरीत पाय घसरून मृत्यू झाल्याचे सांगितले.रात्री 9.30 च्या सुमारास, मृत महिलेची बहीण आणि नातेवाईक आळंदे येथे पोहोचले आणि मृतदेह पाहिला.मृत महिलेचे पती दिपक यांनी सांगितले की, दुपारी 2.30 च्या सुमारास मृत महिला भांडी घासण्यासाठी विहिरीवर गेली होती आणि बराच वेळ झाल्याने तिला शोधण्यासाठी गेल्यावर ती विहिरीत बुडालेली दिसली. यानुसार राजगड पोलिस स्टेशन मध्ये आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तर मृत महिलेची बहिन यांच्या म्हणण्या नुसार,गौरी आणि दिपक यांच्यात वारंवार वाद होत असत. शुक्रवारी दि. ५ रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास दिपकने गौरीला पुन्हा मारहाण केली. यानंतर गौरी घरातून बाहेर पळत गेली आणि विहिरीजवळ पोहोचली. दिपकने तिचा पाठलाग केला आणि तिला विहिरीत ढकलून दिले.गौरीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला व या सर्व घटनेला आत्महत्येचे स्वरून देण्याचा प्रयत्न केला यावरून यावरून नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
नातेवाईकांनी अंत्यसंस्कार केल्या नंतर राजगड पोलिस स्टेशन मध्ये धाव घेत पती, सासू व दोन नंदा यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचा आग्रह केला असून राजगड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.