हवेली: उरुळी कांचन पोलिसांनी आज एक धाडसी कारवाईत हातभट्टी व्यवसायावर छापा टाकून हातभट्टी दारूची भट्टी फोडून अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली. यामध्ये पाचशे पंचवीस लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली तसेच अंदाजे एकूण पाच हजार लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले,तर दुसऱ्या कारवाईत सुमारे नऊ हजार लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार: गेल्या काही दिवसांपासून उरुळी कांचन परिसरात हातभट्टी व्यवसाय जोरात सुरू असल्याची माहिती उरुळी कांचन चे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांना मिळाली होती.या माहितीच्या आधारावर पोलिसांनी आज एका गुप्त माहितीवरून सोरतापवाडी येथे
हातभट्टी दारूची भट्टी फोडून अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली. यामध्ये पाचशे पंचवीस लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली तसेच अंदाजे एकूण पाच हजार लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले.त्याच आधारे दुसरी कारवाई करत एका नर्सरीवर छापा मारला त्यामध्ये पोलिसांना सुमारे नऊ हजर लिटर अवैध दारू मिळून आली असून पोलिसांकडून जप्त करण्यात आली. पोलिसांची खबर लागताच आरोपी पसार झाले असून त्याचा पोलीस तपास करीत आहेत.
या कारवाईमुळे उरुळी कांचन परिसरातील हातभट्टी दारूवर बंदी घालण्यास मदत होईल अशी आशा पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी व्यक्त केली आहे.