गावाने शुभमच्या यशाचे कौतुक करत केला विशेष सन्मान
भोर तालुक्याच्या वेळवंड खो-यातील पसुरे येथील शुभम शिवाजी धानवले या युवकाने वडील नसताना घरच्या खडतर हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मंत्रालयाच्या महसूल सहाय्यक पदी उत्तीर्ण होत घवघवीत यश मिळवले. त्याचे वडील कै. शिवाजी तुकाराम धानवले हे स्वर्गवासी असल्याने घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना आपल्या आईने कष्ट करत मला चांगले शिक्षण दिले त्यामुळे त्याने आपल्या यशाचे श्रेय आपली आई सरुबाई शिवाजी धानवले यांना दिले. तिनेच मला घडवलं आणि तिनेच मला शिकवलं असे त्याने सांगितले
शुभमचे प्राथमिक शिक्षण हे पसुरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले त्यानंतर पुढील शिक्षण हे भोर येथे करत स्पर्धा परीक्षेची तयारी भोरमधील ध्येय व संकल्प प्रतिष्ठान या अभ्यासिकेत केली व २०२२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या घेण्यात आलेल्या महसूल सहाय्यक या परीक्षेत उत्तीर्ण झाला. उत्तीर्ण झाल्यावर शुभम धानवले यांचे गावात ढोल ताशांच्या गजरात स्वागत करत त्याचा गावकऱ्यांमार्फत विशेष सन्मान केला.
मित्र, पुस्तक, रस्ता आणि विचार चुकीचे असतील तर माणूस भरकटल्याशिवाय राहत नाही परंतु तेच जर योग्य आणि चांगले असतील तर आयुष्य सुंदर होते असे शुभमने दाखवून दिले. त्याने आपल्या यशात आईसह आपले चुलते रामचंद्र धानवले , मित्र दिगंबर खोपडे, सचिन चिकणे, अमोल खोपडे, सागर खंडाळे, किरण धनावडे, गजानन थोपटे व अमित दिघे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले असे सांगितले.