नागपूर: येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून, विधिमंडळातील विधान परिषद सभागृहामध्ये राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. या सर्व मागण्या विविध माध्यमातून शासनाकडे पत्रकारांनी मांडलेल्या आहेत. असे यावेळी या विषयावर बोलताना विधान परिषद सदस्य सत्यजित तांबे म्हणाले.
तसेच राज्यातील विविध संघटनेच्या प्रतिनिधींसोबत शासनाने बैठकीचे आयोजन करावे, त्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी तात्काळ ही गोष्ट करावी, अशी मागणी देखील यावेळी तांबे यांनी केली. यावर जानेवारी महिन्यामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात यावे. तसेच येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घालून तरतूद करावी, असे यावेळी विधान परिषद उपसभापती नीलम गोहरे यांनी पाटील यांना सांगितले.
त्याचप्रमाणे डिजिटल मीडियाची नोंद कशा पद्धतीने करण्यात यावी यासाठी माहिती संचालन आणि पत्रकार संघटना यांच्याकडून सूचना मागून डिजिटल संकेत स्थळांची नोंदणी प्रक्रिया कशी करण्यात यावी ही गोष्ट बोलताना त्यांनी अधोरेखित केली.
राज्यातील पत्रकार बंधू-भगिनींच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत.
📌 पत्रकारांसाठी महामंडळ असले पाहिजे.
📌 डिजिटल माध्यमांमधील पत्रकारांसाठी नियमावली असायला पाहिजे.
📌 आरोग्यविषयक सोयीसुविधा असायला हव्यात.
📌 पत्रकारांना वेतन/मानधन असले पाहिजे.