राजगड न्युज (पोलखोल भाग ३)
खंडाळा : तालुक्यातील शिरवळ पोलीस स्टेशन आता गुन्हेगारांचा अड्डा बनली आहे. या पोलीस स्टेशन मध्ये सामान्य नागरिक ढुंकूनही पाहत नाहीत. मात्र गुन्हेगार, सावकार,अवैध व्यवसायीक, देहव्यापार व्यवसायातील दलाल यांना मात्र या ठिकाणी पायघड्या घातलेल्या दिसून येतात.याच व्यवसायाशी संबंधित लोक पोलीस स्टेशन समोर खुर्च्या टाकून “त्या” कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मांडीला मांडी लावून बसतात.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये अवैध व्यावसायिक मोठी दहशत निर्माण करीत आहेत.त्यामुळे अन्याय झाला तरी पोलीस स्टेशनला तक्रार देण्याचे धाडस सामान्य नागरिक करीत नाही.
शिरवळ शहरात सध्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मागील काही वर्षा पासून शहरात आणि परिसरात चोऱ्या करणाऱ्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत.वीज वितरणाचे ट्रान्सफॉर्मर चोरणे,मोबाईल टॉवरच्या केबल चोरणे,शेतकऱ्यांच्या विहिरीवरून मोटार आणि केबल चोरणे, बंद घर फोडणे, घरासमोरील मोटरसायकल चोरणे असे अनेक धंदे या टोळ्या करत आहेत.प्रवाशी महिलांच्या गळ्यातील महिलांचे दागिने चोरणाऱ्या महिला टोळ्या देखील या शहरात मोठ्या प्रमाणात आहेत.मात्र या टोळ्यांचे प्रमुख पोलीस चौकीत कायम पडून असतात. आठवडे बाजारात मोबाईल चोरी मोठ्या प्रमाणात होत असते.मात्र पोलीस या मोबाईल चोरीची कोणतीच तक्रार त्या कनिष्ठ अधिकाऱ्याच्या आर्थिक हितसंबंधामुळे घेत नाहीत?. सबंधित लोकांना केवळ मोबाईल गहाळ झाल्याचा दाखल दिला जातो. यामागे क्राईम रेशो वाढत असल्याचं कारण दिलं जातं.पण प्रत्यक्ष क्राईम रेशो कमी करण्यावर कोणीही लक्ष देत नाही. कारण जे चोरी करतात तेच दुसऱ्या दिवशी चौकीत असतात.चोरी किंवा गुन्हा करून पुन्हा पोलिसांसोबत फिरण्याच मोठ धारिष्ट्य या लोकांमध्ये येत कुठून ?
शिरवळ परिसरात अवैध सावकारी मोठ्या प्रमाणात बळावली आहे.अनेक सावकार “त्या” कनिष्ठ अधिकाऱ्याच्या पंगतीला जेवायला असतात. आडल्या नडलेल्या लोकांना १० ते २५ टक्क्याने पैसे पुरवले जातात. कधी कधी तर डबलणे पैसे दिले जातात. नंतर बळजबरी पैसे वसूल केले जातात.तक्रार द्यायला गेल्यावर तो सावकरच पोलीस स्टेशन मध्ये बसलेला असतो. मग तक्रार द्यायची कशी? असा प्रश्न सामान्य लोकांना पडतो आणि तो निघून जातो.
या भागातील जमीन खरेदी विक्रीत ही “त्या” कनिष्ठ अधिकाऱ्याचा मोठा सहभाग असल्याचं पाहायला मिळत.एखादा जमीन विकत नसेल तर त्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा व्यक्तीला खोटे गुन्हे दाखल करून गुंतवल्याचे प्रकार देखील अनेक वेळा घडले आहेत. विशेतः “त्या” कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा यामध्ये मोठा हातखंडा आहे. एका सुशिक्षित तरुणाला या अधिकाऱ्याने त्याची काही जमीन विकण्यासाठी त्याच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात आला.त्याच्यावर खोटे गंभीर गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवण्यात आली. या कनिष्ठ अधिकाऱ्याच्या दबावापुढे त्या तरुणाचे काही चालले नाही.आपला एसपी असलेला व आयुक्त असलेली नातेवायकांच्या जीवावर तो माझे कोणी काही वाकडे करणार नाही, असे ठणकावून सांगत असतो.
सामान्य नागरिक पोलीस स्टेशन मध्ये गेला. तर त्याला त्याच्या शिव्यांचा प्रसाद खावा लागतो. त्यामुळे तेथील पोलीस कर्मचारी सुद्दा आश्चर्य व्यक्त करीत आहेत. सामान्य माणूस असा सापडला असता तर त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असता.सध्या शहरात वाहन चालकाने वाहन रस्त्यावर थोडे जरी लावले तरी त्यांच्यावर खटले दाखल केले जातात.मात्र इथे अपघात होऊनही कोणावरही गुन्हा दाखल केला नाही.त्यामुळे त्यावेळी कर्तव्यावर असणारे “तो” कनिष्ठ पोलीस अधिकारी व पदाचा दुरुपयोग करणार पोलीस कर्मचारी यांच्यावर कारवाईची मागणी लोक करीत आहेत.लवकरच या बाबतचे निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात येणार आहे.
अर्ज आणि चौकशीचा “त्या” कनिष्ठ अधिकाऱ्याचा फंडा
शिरवळ पोलीस स्टेशन मध्ये सध्या “तो” कनिष्ठ पोलीस अधिकारी चौकशीसाठी बोलावून सामान्य लोकांना त्रास देण्याचा मोठा धंदा सुरू आहे.एखादा व्यक्ती तक्रार द्यायला गेला की, त्याला प्रथम सध्या कागदावर अर्ज द्यायला सांगितलं जात. दुसऱ्या दिवशी तक्रारदार आणि विरोधक दोघांना चौकीत बोलावले जाते.मग सुरू होते न्यायदान प्रक्रिया. पोलीस चौकीत जणू न्यायालयच भरत. मग हे चार न्यायाधीश तक्रारदार आणि विरोधकला जोरदार दमदाटी करत.वेळ प्रसंगी शिवीगाळ केली जाते.तत्पूर्वी दुसऱ्या पार्टीकडून तक्रारदाराच्या विरोधात ही असाच अर्ज घेतला जातो.मग तक्रारदारालाच सांगितले जाते की तुझ्याविरोधात ही अर्ज आला आहे.त्याच्यावर कारवाई केली तर तूच्यावर ही करावी लागेल. तू गुन्हा केला नसेल तर कोर्टात सांग पण आम्हाला कारवाई करावी लागेल.आणि मग प्रकरण येते तडजोडीवर अशा प्रकरणात पोलीस दोन्ही बाजूंनी हात साफ करतात.मात्र न्यायाच्या आपेक्षेने पोलिसात गेलेली ती व्यक्ती पुन्हा पोलिसांची पायरी नको म्हणत खिसा मोकळा करून हात चोळत घरी येतो.
क्रमशः ,……