महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी – चिंचवड आणि डी. वाय. पाटील विद्यापीठ निर्मित तसेच लेखक राजन लाखे संपादित शान्ता शेळके जन्मशताब्दी ग्रंथ ‘बकुळगंध’ यावर समीक्षात्मक चर्चा करण्यात आली. डोंबिवली येथे साहित्यसंपदा या संस्थेतर्फे आयोजित या कार्यक्रमात व्यासपीठावर संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक वामनराव देशपांडे, ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ फेम विसुभाऊ बापट, (Pimpri News) महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी – चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, मसाप डोंबिवलीचे सुरेश देशपांडे, साहित्यिक रमेश धनावडे, वैभव धनावडे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमात शान्ताबाई शेळके यांच्यावर आधारित असलेल्या या ग्रंथचर्चेत वामनराव देशपांडे, विसुभाऊ बापट, सुरेश देशपांडे यांनी सहभाग घेतला. (Pimpri News) साहित्यविश्वात एका कवयित्रीवर, तिच्या साहित्यावर तसेच आठवणींवर अशा प्रकारचा ग्रंथ आजपर्यंत झाला नसल्याचे मत व्यक्त करून संदर्भग्रंथ म्हणून ‘बकुळगंध’ हा ग्रंथ मोलाची भूमिका बजावेल, असे भाकीत चर्चेच्या माध्यमातून करण्यात आले.