वाई प्रतिनिधी : सूशिल कांबळे
वाई : लोणंद येथील अवास्तव कर वाढ, लोणंद एस. टी. बसस्थानकाचा प्रश्न तसेच मांढरदेव येथील दुकानदारांच्या प्रश्नाबाबत वाईखंडाळामहाबळेश्वरचे युवा नेते विराजभैय्या शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदनही देण्यात आल्यानंतर चर्चेप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे लोणंदच्या कर वाढीस स्थगिती देताना बसस्थानकासाठी 5 कोटीचा निधी मंजूर करुन दिला असून मांढरदेव येथील ट्रस्ट व दुकानदारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, युवा नेते विराजभैय्या शिंदे यांनी वाई मतदारसंघातील विविध कामासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसयांची मुंबईत भेट घेतली व निवेदन दिले. लोणंद नगरपंचायतीच्या चतुर्थ वार्षिक कर आकारणीस तात्काळ स्थगिती द्यावी, एजन्सीकडून असंख्य चुका झाले कारणाने फेर सर्वे करण्यात यावा यासाठी निवेदन दिले. अधिक कारवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक तसेच व्यापारी वर्ग त्रस्त झाला होता. अवाढव्य करवाढीचा विषय मुख्यमंत्री साहेबांना सांगितल्यानंतर त्यांनी कारवाढीस तात्काळ स्थगिती व फेर सर्वे करण्याचे आदेश प्रधान सचिव यांना दिले. तसेचलोणंद एसटी स्टॅण्डसाठी पाच कोटींचा निधीसुद्धा मंजूर करून दिला.
विराज भैय्यांनी मांढरदेव येथील देवस्थान ट्रस्ट व दुकानदांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी ट्रस्टी व दुकानदारांची तातडीने बैठक मुख्यमंत्र्यांच्या दालनात घेण्यात यावी असे निवेदन दिल्यानंतर साहेबांकडून तातडीने बैठक लावण्याचे आदेश देण्यात आले. मांढरदेव देवस्थान परिसरातील जे काही दुकानदार आहेत त्यांचे उपजीविकेचे साधन ती दुकाने गेली 50 ते 60 वर्षा पासून आहेत, त्यांच्यावर अन्याय न होऊ देता त्यांची काय मागणी आहे हे मुख्यमंत्री साहेबांनी विराज भैय्यांकडून ऐकून घेतली व त्यावर बैठकीत अंमलबजावणी होईल याची खात्री दिली.
यावेळी विराज भैय्या यांच्यासमवेत आनंदराव शेळके मामा, राहुल दादा घाडगे, प्रवीण व्हावळ, राजश्रीताई शेळके, संदीप शेळके, साजिद बागवान, हर्षवर्धन शेळके, निलेश शेळके, दिपक डोणीकर व इतर मान्यवर उपस्थित होते.