पेण प्रतिनिधि| किरण बांधणकर
पेण : चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया पेण, कै. मोरेश्वर भगत सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय खारपाडा, पेण आणि लायन्स क्लब ऑफ न्यू बॉम्बे सी. बी. डी. यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर कै. मोरेश्वर भगत सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते आणि आदिवासी बांधवाना मोफत अन्न-धान्य वाटपही करण्यात आले.
या आरोग्य शिबिरासाठी सी. बी. डी. येथील अपोलो हॉस्पिटलने संयोजन केले. या शिबिरात अपोलो हॉस्पिटल तर्फे मोफत रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, नेत्र तपासणी, ईसीजी, कॅल्शियम तपासणी, उंची आणि वजन तपासणी करण्यात आली तसेच गरजूंना मोफत चाष्मेही देण्यात आले. या शिबिराचा आदिवासी व ग्रामीण भागातील एकूण २०० लोकांनी लाभ घेतला.
तसेच यानंतर १५० आदिवासी कुटुंबाना अन्न-धान्य किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सीएफआय संस्थेचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किशोर देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.