वाई प्रतिनिधी : सुशील कांबळे
वाई :चार दशकांहून अधिक काळ रिपब्लिकन पक्षाचा निष्ठावंत भीमसैनिक म्हणून परिचित असेलले सतीश चव्हाण यांचे रविवारी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. निष्ठावंत भीमसैनिक हरपला…! अशा प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.
सतीश चव्हाण हा मराठा समजाचा तरुण तरूण वयातच दलित पँथरच्या आंदोलनात सहभागी झाला होता. जिल्हाअध्यक्ष अशोकराव गायकवाड यांच्या विचाराने आणि धाडसी नेतृत्वामुळे प्रभावीत झालेल्या सतीश यांनी अखेर पर्यंत गायकवाड यांची साथ सोडली नाही. प्रत्येक आंदोलन, मोर्चात पुढे असणाऱ्या सतीश जिल्ह्यात परिचित होता. धाडसी आणि आक्रमकपणा ही त्याची आणखी एक ओळख. त्यामूळे नाचा भाई म्हणून तो ओळखला जात. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हेही सतीश यांना नावाने ओळखत. कसल्याही पदाची अपेक्षा नसलेल्या सतीश यांनी अखेपर्यंत खांद्यावर निळा झेंडा घेतला होता.
रविवारी सतीश चव्हाण यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्याच्या निधनाने सर्वस्तरातून दुःख व्यक्त केले जात आहे.
अशोकराव गायकवाड यांच्यासह रिपाइंचे पदाधिकारी, कार्यकर्ते, यानी सतीश यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.