जेजुरीः शहरातील एका खाजगी पार्किंगमध्ये लावण्यात आलेली रिक्षा चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. दि. १० डिसेंबर रोजी हडपसर येथील भाविक जेजुरीत दर्शनासाठी आले होते. त्यांनी आपली रिक्षा एका खाजगी पार्किंगमध्ये लावली होती. त्यानंतर ते देवाचे दर्शन घेण्यासाठी गेले. मात्र, अज्ञात चोरट्यांनी रिक्षाचे हॅन्डल लॅाक असताना रिक्षा चोरुन नेली असल्याची फिर्याद जेजुरी पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
पराग वैजनाथा लाटे वय ४४ वर्ष, राहणार सहयोग कॅालनी, बेनाबाई सुपर मार्केटजवळ काळेपडळ यांनी जेजुरी पोलिसांत रिक्षा चोरीची फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रिक्षाचे वर्णन एक काळे टप असलेली बॉडी काळे रंगाची तीन चाकी रिक्षा नं एम एच .12 क्यु आर .6452 असा आहे. दि 10/12/2024 रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजण्याच्या दरम्यान तीन चाकी रिक्षा जेजुरी गावच्या हददीतून सोनवणे पार्किगचे बाजुच्या रोडच्या कडेला हॅण्डल लॉक करून लावली आली होती. असे फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे. अज्ञात चोरट्याचा पोलीस शोध घेत असून या प्रकरणातील पुढील तपास पोलीस हवालदार नांदे हे करीत आहेत.