नवी दिल्लीः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली दाखल झाले असून अजित पवारांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत मंत्रीमंडळ विस्ताराची तारीख सांगितल. तर फडणवीस यांनी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत आमच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली असल्याचे सांगत माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रेयत म्हणाले तारीख तुम्हीच ठरविले आहे, आम्हाला अजून तारीख ठरवाचीये असे फडणवीस म्हणाले. यामुळे अजित पवारांनी तर १४ तारीख मंत्रीमंडळ विस्ताराची सांगितली. पण देवेंद्र फडणवीस यांनी यास दुजारा दिल्याचे दिसते. माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार भाजप २०, शिवसेना १५ आणि राष्ट्रवादी १० असा मंत्रीमंडळाचा फॅाम्युला ठरला असल्याचे सांगितले जात आहे.
मी माझ्या पक्षातील मंत्रीमंडळात कोणाला संधी मिळावी यासाठी आमच्या पक्षातील जेष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली. तसेच मंत्री पदाबाबतची नावे देण्यात आली आहे. आता शॅार्ट लिस्ट केलेली नावे आमच्या पक्षातील वरिष्ठ पातळीवरील नेते अंतिम निर्णय घेणार असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच तुम्ही मंत्रमंडळ विस्ताराची ठरवली असली तरी अद्यापर्यंत आमच्या वतीने तारीख ठरवायचे बाकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे आता मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.