राजगड न्युज नेटवर्क
भोर : पुणे सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री चौकात घरगुती गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याची घटना गुरुवारी (ता.२८) रात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली. वाहन चालकाचे वाहणा वरील नियंत्रण सुटल्याने आपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती भारत गॅस पुरवठा करणारा टँकर क्रमांक एम एच ३१, एफ सी ४०२२ गुरुवार(ता.२८) रात्री १२.३० वाजेच्या सुमारास सातारा पुणे महामार्गावर हरिश्चंद्री येथे वळण घेत असताना वाहनावरील वाहनधारकाचे टँकर वरील नियंत्रण सुटले. अचानक ब्रेक लावल्याने टँकरला झटका लागून गॅस टँक आणि ट्रक ट्रॉली यांना जोडणारी क्लिप तुटल्याने टँकरचा तोल जाऊन रस्त्याच्या बाजूला टँकर पलटी झाला. वाहन चालक थोडक्यात बचावला. गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये सुमारे १७ टन गॅस असून टँकर पलटी झाल्याने काही वेळ चौकातील वाहतूकिवर परिणाम होऊन वाहतूक कोंडी झाली. राजगड पोलीस यांना माहिती मिळताच त्यांनी महामार्ग पेट्रोलिंग दलास माहिती कळवली महामार्ग कर्मचारी आणि पोलीस अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल होत टँकर क्रेन च्या साह्याने बाजूला करण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.