शिक्रापूरः शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांची धारधार शस्त्राने वार करून निर्घूनपणे हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. शिरुर तालुक्यातील हिवरे रस्त्यावर गिलबिले यांची धारधार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली होती. रविवारी दि. १ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही हत्याची घटना घडली होती. या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी आरोपींना १२ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. गिलबिले यांची हत्या पुर्ववैमनस्यातून झाली असल्याचे पोलीस तपासात निषन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी पप्पु नामदेव गिलबिले याला अटक केली आहे. तर दत्तात्रय बंडोपंत गिलबिले (वय ५२) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयत दत्तात्रय गिलबिले यांच्या पत्नी रोहिनी दत्तात्रय गिलबिले यांनी याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार शिक्रापूर पोलिसांनी ही कारवाई केली.
संशय ठरला हत्येचे कारण
पोलिसांनी दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार, मयत दत्तात्रय गिलबिले यांच्या पत्नी रोहिनी गिलबिले आणि पप्पु गिलबिले हे दोघे एकमेकांच्या घराजवळ राहतात. एका वर्षापूर्वी पप्पु गिलबिले याने दत्तात्रय गिलबिले यांच्यावर पत्नीसोबत चॅटिंग केली म्हणून भांडण केले होते. या कारणावरून त्यांच्यात सतत वाद होत होते. याचा राग मनात धरून पप्पु गिलबिले याने रविवारी दि. १ रोजी दत्तात्रय गिलबिले हे त्यांच्या घरासमोरील डिलाईट कॅफे समोर बसले असताना त्यांच्यावर हल्ला चढविला. यावेळी परिसराता मोठा आरडा झाला असल्याने दत्तात्रय गिलबिले यांच्या पत्नी बाहेर आल्या. त्यावेळी दत्तात्रय हे जिन्याखाली रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले होते. यावेळी त्यांच्या शरीरावर धारधार शस्त्राने हल्ला केल्याच्या खुना होत्या. त्यांनी आपल्या पत्नीला पप्पु गिलबिले याने आपल्यावर हल्ला केल्याचे सांगितले.
आरोपीचा १२ तासांत लावला छडा
यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांना डॅाक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पप्पु गिलबिले याच्या पत्नी सोबत चॅटिंग करत असल्याचा संशयावरुन खून केला असल्याची फिर्याद त्यांच्या पत्नी रोहिनी यांनी नमूद केले आहे या घटनेनंतर आरोपी फरार होता. त्याच्या मागावर पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आले होते. पोलिसांनी कसून शोध घेतल्यानंतर आरोपी पप्पु गिलबिले याला १२ तासांच्या आत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मस्कर करीत आहेत.