चैन्नईः महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडली असून, तिकडे तमिळनाडूत फेंगल चक्रीवादामुळे जनजीवन विस्कळीत केले आहे. सध्याच्या घडीला तमिळनाडूत मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस कोसळत असून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढला आहे. चैन्नई शहरासह अनेक सकल भागात पाणी साचल्याने वाहन चालकांना वाहने चालविताना अडचण निर्माण होत आहे. आयमडीमीने पुढील काही दिवसांत अशाच प्रकारची स्थिती राहणार असल्याचा इशार दिल्यानंतर तमिळनाडू सरकाने राज्यातील अनेक ठिकणाच्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच सुरक्षेता आणि दक्षतेची काळजी म्हणून परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत चैन्नई आंतराराष्ट्रीय विमानतळावरील सर्व विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आलेली आहेत.
राज्यातील चैन्नई, तिरुवल्लुर, काँन्जिपूरम, चैन्नगपट्टू आदी महत्वाच्या शहारांना रेड अलर्ट जारी केला आहे. या भागात ताशी ९० किलोमीटर पर अव्हर वेगाने वारे वाहत आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून ठिकठिकाणी २ हजार २२९ रिफ्युज्यी कँप तयार करण्यात आलेले आहेत. तमिळनाडू सरकाने या पार्श्वभूमीवर काही नियम लागू केलेले आहेत. या भागात मोठ्या प्रमाणावर मच्छिमार असल्याने त्यांच्यासाठी देखील नियम व अटी घालण्यात आलेल्या आहेत. यामुळे आगामी काळात परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध उपाययोजना येथील सरकारच्या वतीने करण्यात येत आहेत.