कलानगरीः डिसेंबरच्या ६ तारखेला पुष्पा २ रिलीज होत असून, छावा सिनेमा देखील याच दिवशी रिलीज होणार होता. मात्र, सिनेमाकर्त्यांनी छावाला पुष्पा 2 सिनेमासोबत कॅश न करण्याचा निर्णय घेत छावाची रिलीज डेट पोस्टपोन केली आहे. खरंतर सिनेमा इंडस्ट्रीमधील सर्वांत आयकॅानिक सिनेमा म्हणून पुष्पा सिनेमाकडे पाहिले जाते. मात्र, सध्याच्या घडीला सर्वच ठिकाणी पुष्पा 2 ची क्रेझ पाहिला मिळत असून, छावाला आर्थिक नुकसान होऊ शकते म्हणून छावाची रिलीज डेट पुढे ढकल्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी 2025 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशी छावा रिलीज करण्यात येणार आहे.
पुष्पा द राईज या सिनेमाने बॅाक्स अॅाफिसवर अशरशःहा धुमाकूळ घातला होता. या सिनेमाचा पुढचा भाग कधी येणार यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर या सिनेमाचा दुसरा भाग म्हणजेच पुष्पा द रूल ६ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे. या भागात पुष्पा काय करणार आणि पुष्पाराज कसा असणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. स्त्री २ सिनेमाच्या रिलीजच्या दिवशी छावा सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. या टीझरने सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिल अशा पद्धतीने टीझर होता. छावा हा सिनेमा छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रपट उलघडून सांगणारा आहे. यामुळे या सिनेमात संभाजी महाराज यांच्या शौर्याचे दर्शन होणार असून, त्यांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल आहे.