दिल्लीः आज दि. २६ नोव्हेंबर म्हणजेच संविधान दिवस असल्याने सर्वत्र संविधान दिन साजरा करण्यात येत असून सर्वांना शुभेच्छा देण्यात येत आहे. या दिनाचे औचित्य साधत दिल्लीत राहुल गांधी यांनी संविधान दिनाचे वैशिट्ये ओधोरेखित करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागले. राहुल यावेळी बोलत असताना त्यांनी लाल रंग असलेली संविधानाचे पुस्तक सर्वांना दाखवत हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाचलेले नाही, असे ते म्हणाले. हिंदुस्थानाचे हजारो वर्षांचा विचार म्हणजे संविधान असून, २१ व्या शतकात डॅा. बाबासाहेब आंबडेकर, गौतम बौद्ध यांचे विचार लाभलेले आहेत. देशातील आदिवासी युवक, दलित युवक यावेळी वाक्य पूर्ण होणार तोच राहुल यांचा माईक बंद झाला. माईक सुरू झाल्यानंतर राहुल यांनी जो कोणी आदिवासी आणि दलित यांच्यावर बोलतो, त्याचा माईक बंद होतो. पण मी मात्र बोलत राहणार असे ते यावेळी बोलताना म्हणाले.
माईक बंद झाल्यानंतर मला खाली बसण्यासाठी सांगण्यात आले. मात्र, मी त्यांना सांगितलं की मी असाच उभा राहणार आहे. माईक सुरू झाल्यावर त्यांनी पुन्हा भाषणाला सुरूवात करताच उपस्थितांनी टाळ्यांचा वर्षाव केला. देशातील आदिवासी आणि दलित समाजामधील मुले मुली ही स्वप्न पाहतो. कोणाला इंजिनिअर, कोणाला डॅाक्टर तर कोणाला इंजिनिअर व्हायचं आहे, मात्र सिस्टीमच यांच्या विरोधात असल्याचे प्ररखड प्रतिपादन राहुल यांनी केले. टाटा, बिर्ला, अदानी यांची मालकी आहे, हीच खरे वास्तव आहे. तुम्हाला सांगितलं जातं की हा देश तुमचा आहे, मात्र ज्यावेळी जातीय जणगणणा केली की सर्व गोष्टी समोर येतील, असे त्यांना सांगितलं.
तुमच्या समोर एक भिंत उभी केली जातेयं
तुमच्या समोर एक भिंत उभी केली जात असून या भिंतीला मजबूत करण्याचे काम मोदी आणि आरएसएस करीत असल्याचे त्यांना सांगितले. यामुळे जातीय जणगणणा केल्यानंतर आल्याने डेटातून सगळं बदलले असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.