उरळी कांचनः येथील ५० वर्षीय व्यक्ती सकाळच्या सुमारास नैसर्गिक विधी करण्यासाठी सायरस पुनावाला परिसरात असणाऱ्या काटवाणात गेली असता डुकरांनी केलेल्या हल्ल्यात मूत्यू झाला आहे. ही घटना दि. २२ नोव्हेंबरच्या दिवशी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत बापू सिताराम खामगळ (वय ४५ आश्रम रोड उरळी कांचन) यांचा मूत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
खामगळ हे मिळत ते काम करून आपला उदरनिर्वाह करीत होते. नेहमीप्रमाणे ते नैसर्गिक विधी करण्यासाठी येथे काटवाणात गेले होते. खामगळ यांचा मृत्यदेह सायरस पुनावाला शाळेजवळ पीर बाबा दर्ग्यासमोर एका व्यक्तीला दिसला. या घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेतली. या घटनेत खामगळ यांची पाठीमागील जागा डुकरांनी खाल्ली असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॅाक्टारांनी त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.