कलानगरीः पुष्पा २ पिक्चर बॅाक्स अॅाफिसरवर राडा करत असताना आता अभिनेता सनी देओलचा जाट पिक्चरचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पिक्चरच्या टिझरमध्ये सनीचा हटके अॅक्शन लूक दिसत आहे. गदर २ नंतर सनीचा जाट हा दुसरा पिक्चर आहे. या पिक्चरचं पहिल्या पोस्टरमध्ये सनी हातात फॅन धरतो ते पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं. आता पिक्चरचा टीझर भेटीला आला असून, जाट हा सनी पाजीचा पिक्चर ५ एप्रिल २०२५ मध्ये थिएटर्समध्ये रिलीज करण्यात येणार आहे.
पिक्चरच्या टीझरमध्ये सनीचा लूक जरा साऊशच्या पिक्चर सारखा दिसतोय. यामुळे पिक्चरमध्ये मारधाड अॅक्शन सीन्स असणार यात काही शंका नाही. विलनच्या भूमिकेत रणदीप हुडा असून मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमये देखील अभिनय साकारताना दिसत आहे. यामुळे सनीच्या जाट पिक्चरबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली आहे.