मुंबई – शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे सातत्याने भाजपनेते गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल करत आहे. शिवाय अजित पवार गटाबाबतही खडसे यांनी नुकताच गौप्यस्फोट केला होता. यावर आता राष्ट्रावादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री अनिल पाटील यांनी पलटवार केला आहे. खडसे यांनी केलेल्या दाव्यात काही तथ्य असेल असं आपल्याला वाटत नाही. ज्या दिवशी आम्ही शपथ घेतली, त्याचवेळी आमच्याकडे येण्याचा खडसेंकडून प्रयत्न झाला होता. मात्र तीन पक्षाचं सरकार असल्यामुळे तिन्ही पक्षांचे विचार एकत्र घेतल्यानंतरच कोणाला घ्याव आणि नाही घ्यावं हा निर्णय घेता येतो. मात्र याचा अधिकार अजित पवार यांनाच आहे, असंही पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान खडसे माझ्या सारख्याच्याही संपर्कात असतात. प्रत्येकाला निर्भिडपणे काम करावं वाटतं. विकासासाठी आमचाही हातभार लागायला पाहिजे. जिल्ह्याचा विकास अजितदादांच्या माध्यमातूनच होऊ शकतो, हा त्यांना त्यांना आत्मविश्वास असेल. त्यामुळे मेटकरींनी संपर्क केला कि त्यांनी संपर्क केला, याबाबत खुलासा करण्याची आवश्यकता नाही.खडसे राजकीय, विकासाच्या दृष्टीकोनातून, जिल्ह्यातील प्रश्नासंदर्भात संपर्कात असतात, असही पाटील यांनी नमूद केलं. मला अजित पवारांनी विचारलं होतं. मला मिटकरी यांचाही फोन आला होता. मात्र आम्ही कुठल्याही परिस्थितीत पवार साहेबांची साथ सोडणार नाही, असं आपण सांगितल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला होता.