बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा हे नुकतेच लग्नबंधनात अडकले. हा लग्न सोहळा उदयपूरच्या लिली पॅलेस इथे पार पडला. काल रात्रीच या जोडप्याचा लग्नानंतरचा लूक समोर आला होता. यामध्ये हे नवविवाहित जोडपं खूपच छान दिसत होतं. आता परिणिती चोप्राने आपला लग्नाचा लूकही शेअर केला आहे. तिचे चाहते तिच्या लग्नाच्या फोटोची आतुरतेने वाट पाहत होते. आता परिणितीने आपल्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिच्या साध्या लूकमुळे ती सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे.
परिणिती चोप्राने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हे फोटो शेअर केले आहेत. या दोघांच्या लग्नविधीदरम्यानचे हे फोटो आहेत. यामध्ये परिणितीने अगदी साधा लूक केला आहे. परिणितीने बेज रंगाचा घागरा परिधान केला आहे. यावर तिने फिकट हिरव्या, पाचू रंगाचे दागिने घातलेले आहेत. परिणितीचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.