Asian Games 2023 Indian Women’s Cricket Team Clinch Historic Gold Medal : आज १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेचा पराभव करत सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी भारताने नेमबाजीत पहिले सुवर्ण जिंकले होते. सुवर्णपदकाच्या अंतिम सामन्यात भारताच्या 117 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 97 धावाच करू शकला. आणि टीम इंडियाने हा सामना 19 धावांनी जिंकला.
भारताच्या विजयात वेगवान गोलंदाज तीतास साधूचे महत्त्वाचे योगदान होते. त्याने 4 षटकात 6 धावा देत 3 बळी घेतले. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात क्रिकेटचा समावेश होण्याची ही तिसरी वेळ होती. यापूर्वी, दोन वेळा क्रिकेट या खेळांचा भाग झाला तेव्हा भारताने त्यात भाग घेतला नव्हता. म्हणजे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत पहिल्यांदाच क्रिकेट खेळत आहे. त्यामुळेच चीनच्या भूमीवर भारतीय मुलींनी क्रिकेटमध्ये इतिहास रचला असे आम्ही म्हणत आहोत.