वाई प्रतिनिधी : सुशील कांबळे
वाई : पुणे – बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वेळे येथे थांबलेल्या बसमधून लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या भांमट्याला भुईंज पोलिसांच्याडिबी पथकाने मध्यप्रदेश मध्ये बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या विशेष कामगिरीचे कौतुक होत आहे. आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
याबाबत महिती अशी की वेळे येथील एका हॉटेलवर खाजगी बस जेवण्यासाठी थांबली होती. यावेळी गिरासे याच्या बॅगेतून चोरट्यांनी 22 लाखाची रोकड लंपास केली होती. सुवर्णा बिल्डकॉम कंपनीच्या मशीनरी विक्रीतुन आलेले हे २२ लाख रुपये होते . गिरासे यांनी तातडीने भुईंज पोलीस ठाण्यात या संदर्भात चोरीची तक्रार दिली होती त्यावरून अज्ञात आरोपींना विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि ही गंभीर घटना असल्याने पोलीस कामाला लागले.
सदर गुन्हयातील चोरीस गेलेला मुददेमाल जास्त असल्याने पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी सदरचा गुन्हा उघड करण्याच्या सुचना दिल्या होत्या. सदर गुन्हयातील आरोपी हे अज्ञात असल्याने त्यांना निष्पन्न करण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते.
त्याकरीता भुईंज पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स्वतंत्र पथक तयार करुन त्यांना आरोपी निष्पन्न करणेबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच स्थानिक गुन्हे शाखेची टीम देखील या गुन्हयाचा समांतर तपास करीत होती. तपास पथकाने गुन्हयाच्या तपासात घटनास्थळाचे परिसरातील, सातारा – पुणे हायवे रोडवरील तसेच आरोपींच्या गुन्हा करुन पळून जाण्याच्या मार्गावरील जवळपास १०० पेक्षा जास्त ठिकाणचे सी.सी.टी.व्ही फुटेज तपासून आरोपी निष्पन्न
केले. आरोपी हे मध्यप्रदेश राज्यातील धरमपुरी, ( जि. धार) येथील राहणारे असल्याने पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचीम व पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा, भुईंज तसेच स्थानिक गुन्हे शाखा, सातारा कडील तपास पथकाने कसून तपास करीत ८ ऑक्टोबर २०२३ रोजी गुन्हयातील आरोपी नामे रज्जब हसन खान, (वय ४१ वर्षे, रा.सिंधीमोहल्ला, धरमपुरी, जि. धार, राज्य मध्यप्रदेश) यास धरमपुरी, मध्य प्रदेश येथुन ताब्यात घेतले .
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, वाई यांच्यासमोर हजर केले असता असता त्याला १पर्यंत ३ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे .