खेड शिवापूर: शिवभूमी विद्यालयाच्या विद्यार्थांसाठी प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे “संघर्षातून यशाकडे, बाप समजावून घेताना” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानानंतर विद्यार्थिनींनी आपल्या भावना व्यक्त करताना अश्रू अनावर केले आणि हंकारे यांना खऱ्या अर्थाने ‘बाप’ मानले.
विद्यार्थिनींनी सांगितले की, आजपर्यंत आई-वडिलांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टांची जाणीव नव्हती. हंकारे यांच्या व्याख्यानानंतरच त्यांना समजले की खऱ्या अर्थाने आपण किती भाग्यवान आहोत. अनेक विद्यार्थिनी व्याख्यानादरम्यान रडू लागल्या होत्या
शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी आयोजित यांनी आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत “संघषीतून यशाकडे, बाप समजावून घेताना” या विषयावर प्रसिद्ध वक्ते वसंत हंकारे यांनी शिवभूमी विद्यालयातील विद्यार्थांना व्याख्यान दिले. व्याख्यानानंतर विद्यार्थिनींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आजकालच्या मुली व्यसनाधीन होत आहेत आणि गुन्हेगारीकडे वळत आहेत यामुळे पालक अडचणीत येतात हे अल्पवयीन मुलींना समजत नाही. हंकारे यांनी १३ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना बाप काय असतो आणि त्याची जबाबदारी काय असते याचे हृदयस्पर्शी विवेचन केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, शिवसेना बारामती लोकसभा संघटक कुलदीप कोंडे, शिवभूमी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कोंडे, सचिव संग्राम कोंडे, राष्ट्रवादीचे खडकवासला विधानसभाध्यक्ष राजेंद्र पवार, सरपंच अण्णा दिघे, राकेश गाडे, स्वप्निल जगताप, अमोल कोंडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक रजपूत, राजू सट्टे, प्राचार्य सुनील चौधरी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते