खेडेगावातील खेळाडूंनी देशात गावाचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले
दत्तात्रय कोंडे: खेड शिवापूर
खेड शिवापूर (वार्ताहार) दि.06 :- वाको इंडिया राष्ट्रीय किकबॉक्सींग चॅम्पियनशिप २०२३ देहरादून उत्तराखंड येथे १ ते ३ ऑक्टोबर दरम्यान पार पडली. या स्पर्धेमध्ये देशातील एकूण १५ राज्यातील ८०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या बाजूने आर्या स्पोर्ट्स क्लबचे एकूण २२ खेळाडू सहभागी झाले होते. या २२ खेळाडूंनी तब्बल २१ सुवर्ण, ६ रौप्य तर ७ कांस्य पदकांची लयलूट केली.
या सर्व खेळाडूंना मार्गदर्शन आर्या स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष योगेश सुर्वे व सचिव दीपक आनंदकर यांनी केले. तसेच या सर्व खेळाडूंना राष्ट्रीय किक बॉक्सिंगचे अध्यक्ष सी. ए. तांबोळी व महाराष्ट्र किक बॉक्सिंगचे सचिव बापूसाहेब घुले यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच शिवापूर गावाचे सरपंच, उप सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्यावतीने पदक विजेत्या खेळाडूंचा भव्य सत्कार समारंभ करण्यात आला. दोन सुवर्ण पदक जिंकून देणारी स्नेहा दिघे ही दै. पुढारीचे पत्रकार किरण दिघे यांची पुतणी आहे.
विजेते खेळाडू – युवराज गुजर (2 सुवर्ण पदक), अथर्व भनगे (कांस्यपदक), स्नेहा दिघे (2 सुवर्ण पदक), रूद्र शेंडगे ( सुवर्ण पदक), प्रेम धुमाळ (कांस्य पदक), राज वासवंड (2 सुवर्ण पदक), रोहित खाडे ( 2 सुवर्ण पदक),Bअद्वेत थोरात ( कांस्य पदक), अथर्व गायकवाड ( सुवर्ण / रौप्य पदक), प्रणव भनगे (कांस्य पदक)अभिषेक विश्वकर्मा ( 2 रौप्य पदक), आशिष चोरघे ( सुवर्ण / रौप्य पदक), गंधर्व गरडे (सुवर्ण/कांस्य पदक), तन्मय भोसले(रौप्य पदक)समर्थ पाटील(2 सुवर्ण पदक)ज्ञानेश्वरी दानवले(2 सुवर्ण पदक), श्रुती खोपडे(2 सुवर्ण पदक), सृष्टी शेटे(सुवर्ण/रौप्य पदक), कल्याणी जाधव(सुवर्ण/रौप्य पदक), आकांशा उल्हाळकर (सुवर्ण पदक), तनुश्री सावळे (कांस्य पदक).