दत्तात्रय कोंडे : राजगड न्यूज
खेड – शिवापूर (वार्ताहार) दि 26 :- शिवगंगा खोऱ्यातील सात दिवस गणपती बाप्पा असतात. सातव्या दिवशी गणपती बाप्पा चे या शिवगंगा खोऱ्यातील शिवापूर, श्रीरामनगर, गाऊडदरा, कोंढणपूर, राहाटवडे, आर्वी, शिवतारेवाडी, कल्याण सर्व (ता. हवेली), तर भोर तालुक्यातील वेळू, कासुर्डी, रांजे, ससेवाडी, कुसगांव येथील गावातील स्थानिकांनी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ढोल-ताशा, डीजे, व पारंपरिक वाद्याच्या निनादात बाप्पांच्या मिरवणुका काढून निरोप देण्यात आला. सुरुवातीला जल्लोष करणारा गणेश भक्त बाप्पांना निरोप देताना मात्र हिरमुसलेला दिसून आला.
खेड शिवापूर परिसरातील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते, बाप्पांचे पूजन करून मिरवणुकीस संध्याकाळी साडेसहा वाजता सुरुवात झाली. प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह इतर पदाधिकारी मिरवणुकीत सहभागी झाले होते. शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, शंकर कोंडे, गणेश पायगुडे, शिवराज मिठारे ,युवा सेना हवेली तालुका प्रमुख आदित्य बांडेहवालदार, शिवापूरचे सरपंच संजय दिघे, उपसरपंच राजू सट्टे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सामाजिक कार्यकर्ते चांगदेव हावलदार, गाउडदराचे सरपंच राकेश गाडे, तंटामुक्ती अध्यक्ष उमेश दिघे, तसेच नवयुग तरुण मित्र मंडळाचे मयूर मोरे व उपाध्यक्ष स्वप्नील परठे , श्रीमंत जय गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष ओंकार कोंडे व उपअध्यक्ष अभिजित कोंडे , श्रीराम मित्र मंडळ चे अध्यक्ष विवेक पवार व उपअध्यक्ष प्रसाद जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्था यासाठी राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या नेतृत्वाखाली ,उपनिरीक्षक दाजी देठे, प्रमिला निकम, राहुल कोल्हे उपस्थित होते .
शिवापूर ता.हवेली येथील शिवगंगा नदीमध्ये बाप्पांचे विसर्जन केले जाते. शिवापूर गावातील गणपती, कोंढणपूर रस्त्याने श्रीरामनगर येथे जातात. सदर गावाला प्रदक्षिणा घालून पुन्हा शिवापूर गावाकडे रवाना होतात, सोबत श्रीरामनगर व खेड शिवापूर बागेतील मंडळांना घेतात. शिवापूर गावात सर्व मंडळे पारंपरिक खेळ खेळूतात. त्यानंतर शिवगंगा नदीकडे प्रस्थान करून बाप्पांचे विसर्जन केले जाते.