साताराः पुण्यात कोयत्याने वार केल्याच्या घटना वारंवार घडतच असतात. आता सातारा जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. बँक कर्ज देत नाही म्हणून एकाने बँक मॅनेजरवर कोयत्याने सपासप वार केले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्हा हादरला असून, ही घटना जिल्ह्यातील कराड तालुक्यातील इंडियन ओवरसीज बँकेत घडली आहे. या बँकेत एकाने कर्ज प्रकरण केले होते. पण कर्ज मिळत नसल्याचा राग अनावर झाल्याने ही धक्कादायक घटना घडली आहे.
कराड पोलिसांनी दिलल्या माहितीनुसार, येथील ओवरसीज बँकेचे मॅनेजर आशिष कश्यप यांच्यावर रेठेर बुद्रुक येथील आशितोष दिलीप सातपुते यांनी कोयत्याने वार केले आहेत त्याने शिळी पालनासाठी बँकेकडे कर्ज प्रकरण केले होते मात्र या व्यवसायासाठी कश्यप हे कर्ज देत नसल्याच्या रागात त्याने हे कृत्य केले आहे. या हल्ल्यात कश्यप हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर स्वरुपाची इजा झाली आहे.
त्यांच्यावर कराड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, या प्रकरणी कराड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कराड पोलीस करीत आहेत.