साताराः राज्यात विधानसभेचे बिगूल वाजले आहे. सातारा जिल्ह्यातील राजकीय घडोमोडींना वेग प्राप्त झाला आहे. यातच भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उमेदवारी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भक्कम पाठिंबा जाहीर केला. येथील आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. तसेच उदयनराजे म्हणजे शिवेंद्रराजे आणि शिवेंद्रराजे म्हणजेच उदयनराजे आहे, हे समजून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उमेदवारीच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सह प्रभारी अजय जमवाल, महाराष्ट्र संगठन मंत्री रघुनाथजी कुलकर्णी, सुनील काटकर, वसंतराव मानकुमरे, भरत पाटील, सातारा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा सरचिटणीस संतोष कणसे, सुवर्णा पाटील, अशोकराव मोने, ज्ञानदेव रांजणे, सौरभ शिंदे, अमिन कच्छी, रंजना रावत, गीतांजली कदम, निशांत पाटील, विकास गोसावी, मंडल अध्यक्ष महेश गाडे, मंडल अध्यक्ष शंकरराव माळवदे, लक्ष्मणराव कदम उपस्थित होते.