विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात ‘मनुस्मृती’चा समावेश केल्याने निषेध
खेड शिवापूर : खेड शिवापूर टोल नाका तालुका हवेली जिल्हा पुणे येथे प्रवीण ओव्हाळ (पुणे जिल्हा युवक अध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यांतील रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य शासनाने इयत्ता 1 ली ते 12 वी अभ्यासक्रमात मनुस्मृतिचे धडे जानिव पूर्वक लादु नयेत याच्या निषेधार्थ संविधानिक मार्गाने जाहिर निषेध आंदोलन शांततेत पार पडले.आंदोलनकर्त्यांनी शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक मनुस्मृतीने नाकारला होता आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणासाठी लढा दिला होता हे अधोरेखित केले. त्यानंतर, सदर ठिकाणी मनुस्मृती पोस्टरचे आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रतिमा असलेल्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
संविधानिक मार्गाने जाहीर निषेध करण्यासाठी रविवारी खेड शिवापूर येथे भीमसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी बोलताना अमोलिक म्हणाले की, हे जातिवादी सरकार आमच्यावर मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा आम्हो निषेध करतो, आम्ही हे होऊ देणार नाही.”
जिल्हा युवक अध्यक्ष प्रवीण ओव्हाळ यांनी भूमिका मांडताना सांगितले की, निव्वल शिक्षणमंत्री केसरकरांच्या मनात आल्याने अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होत आहे.शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक मनुस्मृतीने नाकारला होता आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणासाठी लढा दिला होता हे अधोरेखित केले. आंबेडकरी जनता हे सहन करणार नाही व गप्प बसणार नाही. मुख्यमंत्र्यांनी याबाबत लक्ष घालून यावर त्वरित भूमिका घ्यावी.
यावेळी भीम आर्मीचे भोर तालुका प्रमुख महेंद्र साळुंके, रिपब्लिकन सेना भोर तालुकाध्यक्ष किशोर आमोलिक, वंचित बहुजन आघाडी वेल्हे तालुकाध्यक्ष विनोद गायकवाड, सत्यशोधक बहुजन आघाडी भोर तालुकाध्यक्ष आनंद खुडे, आर. पी. आय आठवले गट युवक जिल्हा अध्यक्ष प्रवीण ओव्हाळ, भोर तालुका युवक अध्यक्ष स्वप्निल सावंत, किकवीचे सरपंच नवनाथ कदम, वंचित बहुजन आघाडी युवाअध्यक्ष संतोष वैराट, सुनील कांबळे आदी उपस्थित होते.
आंदोलकांवर गुन्हे दाखल
खेड शिवापूर टोल नाका या ठिकाणी सविधानिक मार्गाने आंदोलन पार पडल्या नंतर काही वेळातच आंदोलने स्थळी उपस्थित असलेल्या ११ आंदोलकांवर राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.