दत्तात्रय कोंडे|राजगड न्युज
खेड शिवापूर : मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी टोलमुक्तीचा पवित्रा घेतल्याने भोर-वेल्हा, हवेली तालुक्यातील मनसे सैनिकांनी खेड शिवापूर टोलनाक्यावर आंदोलन करण्यात आले. मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत काही काळ टोल वसुली बंद पाडत पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्यावर जाऊन टोल न भरताच छोटी वाहने सोडन्यात आली.
टोलच्या मुद्दयावरून पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्यावर पुणे जिल्ह्यातील मनसैनिक आक्रमक झाले असून मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत काही काळ टोल वसुली बंद पाडत पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्यावर जाऊन टोल न भरताच छोटी वाहने सोडण्यास सुरुवात सुरवात केली तसेच स्थानिक मुद्द्यावरून सुद्धा मनसे सैनिक आक्रमक झाले होते त्यामुळे मनसेच्या आंदोलनामुळं काही काळ तणाव निर्माण झाला होता.
खेड शिवापूर टोलनाका हा मुळातच पीएमआरडी हद्दीच्या बाहेर तातडीने हटवावा, अशी स्थानिकांची कायमची मागणी असून ठरलेल्या निर्णयानुसार एमएच १२ क्रमांकाच्या वाहनांना दिलेली सूट कायम ठेवावी.बाळा नांदगावकर यांनी पदाधिकाऱ्यांना फोनवरून, राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होऊन पुढचे आदेश येतं नाही तोपर्यंत आंदोलन नं करण्याचा आदेश दिल्यानं, मनसैनिकांनी टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना समज देऊन आंदोलन मागे घेतले असून ‘फास्टटॅग’ च्या नावाखाली स्थानिकांकडून सक्तीने वसुली सुरू आहे, ती बंद करण्यात यावी. स्थानिकांकडून ‘फास्टटॅग’ चे स्थानिक वाहनधारकावर भूत बसविले, तर जनता गप्प बसणार नाही, त्याची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनावर राहील अशी माहिती मनसे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांनी दिली.
या वेळी मनसे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर, माजी पंचायत समिती सदस्य विलास बोरगे, वेल्हे तालुकाध्यक्ष दिगंबर चोरगे, संजय लोखंडे, शशिकांत वाघ, विंझर गावचे सरपंच विनायक लिमन,श्रीरामनगरचे अजित पवार, अमोल गायकवाड, विक्रम जगताप, रवींद्र घाडगे आदी मनसे सैनिक उपस्थित तसेच पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.
टोल वसुली बंद झाली नाही तर येत्या काळात राज ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर, राज ठाकरेंनी सांगितल्या प्रमाणे टोलनाका जाळून तीव्र आंदोलन करण्यात येणारं
-मनसेचे पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष दसवडकर
खेडशिवापूर टोलनाका या ठिकाणावरून स्थानिक वाहने आपण मोफत सोडत आहोतहा टोल नाका केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येत असून, येथे कुठल्याही प्रकारच्या वाहनांना टोलमाफी नाही.
अमित भाटिया, व्यवस्थापक खेड शिवापूर टोलनाका