विद्या प्रतिष्ठान शाळेच्या मोफत सायकल वाटप कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी इंग्रजीत साधला विद्यार्थ्यांशी संवाद
कुंदन झांजले| राजगड न्युज लाईव्ह
भोर: विद्यार्थ्यांना शाळेत शिकताना मराठी भाषेसोबत हिंदी इंग्रजी भाषेचे ज्ञान अवगत होते अत्यंत आवश्यक आहे. बाहेरच्या जगात परदेशात इंग्रजी भाषेला खूप महत्त्व आहे आणि तिचं भाषा जगात प्रामुख्याने बोलली जाते . मराठी भाषा जशी आपली माय मराठी भाषा (मातृभाषा) आहे तशीच हिंदी इंग्रजी भाषा आपली मावशी आहे .त्यामुळे इंग्रजी हिंदी भाषा मुलांना येणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन भोर -भोलावडेतील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुलिंना मोफत सायकल वाटप कार्यक्रमात संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल येथे शुक्रवार (दि.५) खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून मुलींना मोफत सायकल वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख पाहुणे संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते शाळेतील प्राथमिक स्वरूपात ५५ मूलींना मोफत सायकल वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे विठ्ठल शिंदे, नितीन धारणे, यशवंत डाळ, मानसिंगबाबा धुमाळ, वंदना धुमाळ, रविंद्र बांदल, संतोष नांगरे, भोलावडे विद्यमान सरपंच प्रवीण जगदाळे , गणेश खुटवड,विद्या प्रतिष्ठान ट्रस्टीचे पदाधिकारी, शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक सेवक वर्ग व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना इंग्रजीत उत्तरे देत आपले शैक्षणिक व राजकीय सामाजिक अनुभव सांगितले तसेच मुलांचे इंग्रजीचे ज्ञान, प्रश्न विचारण्याचे कौशल्य , मनमोकळेपणा पाहून भारावून जाऊन विद्या प्रतिष्ठानच्या इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शिक्षक वर्गाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनीही सुप्रिया सुळे यांना शैक्षणिक,राजकीय, सामाजिक, घरगुती, स्व:ताचे अनुभव असे प्रश्न इंग्रजीत विचारून त्यांचा राजकीय सामाजिक शैक्षणिक प्रवास जाणला.