मुंबईः काल दि. २८ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत दिल्लीत गृहमंत्री अमित शहा, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर तिन्ही नेते पुन्हा मुंबईत दाखल झाले आहेत. आज तिन्ही नेत्यांची एक महत्वपूर्ण बैठक होणार होती, मात्र एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातील दरे गावी जाणार असल्याने ही बैठक रद्द करण्यात आली आहे. शिंदे हे सध्या मुंबईतील वर्षा निवासस्थानी असून ते दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मूळ दरे या गावी जाणार आहेत. यामुळे होणाऱ्या बैठक लांबणीवर पडणार आहेत.
एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी जाणार असल्याने होणाऱ्या बैठका लांबणीवर पडल्या असून, पुढच्या दोन ते तीन दिवस कोणतीही मोठी घडामोड घडणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे हे आराम करण्यासाठी त्यांच्या दरे या गावी जाणार आहेत. शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत खातेवापटपा संदर्भात चर्चा करण्यात आली असून, त्याचे संपूर्ण अधिकार या तिन्ही नेत्यांना दिलेले आहेत. तसेच तुम्ही मुंबईत जाऊन बैठक घ्यावी, जर काही अडचण आल्यास पुन्हा आपण दिल्लीत बसून चर्चा करू, असे शहांकडून सांगण्यात आले आहे. यामुळे आता बैठकांचा सिलसिला शिंदे हे नसल्याने मंदावणार आहे.