भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भोर :वित्तीय सशक्तिकरण दिनाचे औचित्य साधून भोरला टपाल विभागाच्या वतीने मंगळवार (दि.१०)रोजी वित्तीय सशक्तीकरण दिन येथील नगरपालिका सभागृहात साजरा करण्यात आला यावेळी भोर शहर व परिसरात ग्रामीण भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पुणे ग्रामीण टपाल विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भोर विभागाच्या सहाय्यक अधीक्षक नाजनीन पठाण यांच्या उपस्थितीत व ग्रामीण डाक सेवक यांच्या मदतीने वित्तीय सशक्तीकरण दिन साजरा करण्यात आला यावेळी सहाय्यक अधीक्षक नाजनीन पठाण, तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, मेल ओव्हर्सल विलास जेधे, भोरचे पोस्टमास्तर चेतन खराडे, सचिन ठाकूर यांच्यासह ग्रामीण डाक सेवक संतोष बुदगुडे, स्वप्निल पैलवान ,चंद्रकांत डाळ, सुभाष साळेकर ,साहेल मनेर, प्रज्ञा चौगुले, वैशाली जेधे, सविता भागवत, सुजाता कोंढाळकर, पोपट गोळे दिलीप खोपडे, कांचन कठे, रुतिजा नरवटे, यांच्यासह ग्रामीण डाक सेवक मदतीला होते.
वित्तीय सशक्तीकरण या दिवशी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना आय.पी.पी.बी चे प्रीमिय खाते (पी.एम किसान )चे खाते उघडण्यात आले त्याचबरोबर बचत खाते रिकरिंग डिपॉझिट (आर.डी ) टाइम डिपॉझिट, अपघाती विमा, आर.पी.एल.आय, पी.एल.आय ,सुकन्या या व इतर बचतींच्या खात्यांची सविस्तर माहिती देऊन अनेकांची खाती काढण्यात आली पी.एम किसान खाती काढण्यासाठी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर आले होते.