स्वप्नीलकुमार पैलवान: राजगड न्युज
भोर: पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कार भोर तालुक्यातील राजगड ज्ञानपीठ संचलित सरनोबत सिदोजी थोपटे विद्यालय व जुनिअर कॉलेज खानापूर ( ता.भोर ) या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक व पुणे जिल्हा शिक्षक संघाचे उपाध्यक्ष धोंडीबा संभाजी कुमकर यांना प्रदान करण्यात आला आहे.
पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच, ( स्वारगेट ) पुणे या ठिकाणी करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखक शरद तांदळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे. के. पाटील, सचिव शांताराम पोखरकर उपस्थित होते. यावेळी शिक्षण क्षेत्रात येऊ घातलेल्या कंत्राटी करणाला सर्वांनी एकत्र येऊन आंदोलन छेडणे काळाची गरज आहे.तसे न केल्यास पुढची पिढी माफ करणार नाही.असे प्रतिपादन प्रतिपादन मा.शिक्षक आ.जयंत आसगावकर यांनी केले
याप्रसंगी पुणे जिल्हा माध्य व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, सचिव प्रसाद गायकवाड, कार्याध्यक्ष मधुकर नाईक, भोर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व सरनोबत सिदोजी थोपटे विद्यालय खानापूर शाळेचे प्राचार्य रमेश बुदगुडे, कात्रज दूध संघाचे सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी शामराव थोपटे , राजगड ज्ञानपीठ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय अनंतरावजी थोपटे साहेब कार्याध्यक्ष आमदार संग्राम दादा थोपटे सचिव स्वरूपाताई थोपटे ,विश्वस्त बाळासाहेब थोपटे यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष अभिनंदन व शुभेच्छा दिल्या समाजातील सर्व स्तरातून पुरस्कार मिळाल्याबद्दल कौतुक होत आहे
प्राचार्य नंदकुमार सागर यांनी प्रास्तविक केले. शिवाजी कामथे यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद गायकवाड यांनी आभार मानले.