नसरापूर राजगड न्युज नेटवर्क
नसरापूर : जिल्हास्तरीय शासकीय मैदानी स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी,पुणे येथे नुकत्याच पार पडल्या असून स्पर्धेमध्ये श्री शिवाजी विद्यालय व जुनिअर कॉलेज नसरापूरच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत मैदानी स्पर्धेत छाप पाडली.
१९ वर्ष वयोगटा खालील मुली १०० मीटर ,२०० मीटर आणि ४०० मीटर धावणे या तीनही क्रीडा प्रकारात विद्यालयातील अंकिता लक्ष्मण इंगुळकर आणि लांब उडी क्रिया प्रकारात संस्कृती संदीप वाल्हेकर हिने जिल्हा स्थरावर प्रथम क्रमांक पटकाविला असून त्यांची विभागीय पातळीवर निवड झाली आहे.
जिल्हास्तरीय शासकीय स्पर्धेत धावणे,लांब उडी,गोळा फेक,तळी फेक,भालाफेक इ.क्रीडा प्रकारात १४ ते १९ वर्षे वयोगटातील १३ विद्यार्थ्यानी सहभाग घेत आपले कौशल्य पणास लावले.१५०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात यश गोवर्धन महाले आणि तानिया सुनील पवार यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला.
यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य एस.वाय.शिंदे, पर्यवेक्षक ए.आर. खोपडे,विभाग प्रमुख वाय.एम.मिसाळ,व्ही. एस.धेंडे,प्रा.सतीश पुणेकर,एस.के.बिबवे यांनी अभिनंदन केले.