साताराः राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असताना राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा येथील त्यांच्या मूळ दरे या गावी गेल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. राज्यात महायुतीची सत्ता येणार असताना दिल्लीसह मुंबईत राजकीय घमासान घडत असताना शिंदे मात्र त्यांच्या गावे आराम करण्यासाठी आल्याचे सांगितले जात आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसपांसून सुरू असलेल्या बैठकांना ब्रेक लागला आहे. यामुळे आता येत्या काही दिवसांत यावर काय होते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
काल संध्याकाळी ज्यावेळी एकनाथ शिंदे हे वर्षा निवासस्थाहून दरे गावाच्या दिशेने निघालेले असाताना जितेंद्र आव्हाड आणि बच्चू कडू व अन्य काही आमदार त्यांच्या भेटीसाठी आले होते. मात्र, त्यानंतर शिंदे हे आपल्या पत्नीसोबत दरे गावी आले आहेत. त्यांच्या मूळ गावी असलेल्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबंस्त तैनात करण्यात आला आहे. शिंदे यांची तब्येत काहीशी खालावली असून ते आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे.