मनोज खंडागळे: यवत
यवत : बारामती लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरच्चंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांची प्रचाराची सांगता सभा दौंड तालुक्यातील वरवंड येथे(दि.०४) रोजी संपन्न झाली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री भास्कर जाधव माझे आरोग्य मंत्री राजेश टोपे, होळकर घराण्याचे वंशाचे भूषण सिंह राजे होळकर, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर,विकास लवांडे, सक्षणा सलगर,जगन्नाथ शेवाळे, डीपीआयचे अजिंक्य चांदणे, आप्पासाहेब पवार,योगिनी दिवेकर, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी उपस्थित त्यांना बोलताना शरद पवार म्हणाले की, तुम्ही तुमच्या सत्तेत देशातील जनतेसाठी काय केले हे सांगण्याऐवजी राहुल गांधी यांच्यावर टीका आणि चेष्टा करता हे योग्य नाही. झारखंड आणि दिल्लीचे मुख्यमंत्री यांना केंद्र सरकारने जेलमध्ये टाकले, जनतेला दिलेले कोणते शब्द सरकारने पाळले नाही, राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून देशभर पाई फिरत असताना जनतेच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांच्या कुटुंबांतील सदस्यांनी देशासाठी प्राणाची आहूती दिली आहे. देशातील अनेक प्रश्न जैसे ते आहेत महागाई व बेरोजगारी वाढले असून याकडे मात्र सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले.
केंद्र सरकारने कायम शेतकऱ्यांच्या विरोधात काम केले असून सत्तेचा गैरवापर केला आहे. देशात सर्वत्र महागाई वाढले असून मोदी सरकारने ५० दिवसात महागाई कमी करण्याचे आश्वासन २०१४ मध्ये देण्यात आले होते मात्र महागाई कमी झाली नाही तर अधिकच वाढले असे टीकास्त्र शरद पवार यांनी सोडले.
भीमा पाटस अडचणीत आणणारे अजित पवारच…
दौंड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना कारखान्याला तुमचा उसने नेणार नाही असा काही भागातील शेतकऱ्यांना दम दिला जात आहे शेतकऱ्यांनी अशा धमक्यांना भिऊ नये, ज्या गावच्या बोरी, त्या गावच्याच बाभली आहेत असे म्हणत. उसाची टिपू देखील काळपगड न शिल्लक ठेवणार नाही तसेच किंवा पाटस अजित पवार यांच्यामुळे अडचणीत आला असल्याचा स्फोटक विधान रोहित पवार यांनी केले. कुल -थोरात यांना दौंडची जनता निवडणुकीत आसमान दाखवल्याशिवाय राहणार नसल्याचे मत सक्षणा सलगर यांनी टीका केली.
दादाची दादागिरी संपली…
काही वक्त्यांनी दादागिरी होत असल्याचे संदर्भ देत भाषणात केला. याचाच अर्थ घेऊन अजित पवार यांचे नाव न घेता शरद पवार यांनी विकास कामे करत असताना त्यामध्ये राजकारण करायची नसते. आपल्यासारखा वागला नाहीतर वीज बंद करू, पाणी बंद करू, असे काही नेते म्हणतात, राजकारणासाठी गोरगरीब जनतेला कोणी त्रास देत असेल तर हे दौंडची जनता त्याला चांगला धडा शिकवेल आता दादाची दादागिरी संपली आहे असे थेट भास्कर जाधव यांनी दोनच्या जनतेला आव्हान केले.