वाईः राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, सर्वच पक्षातील उमेदवारांनी आपापल्या मतदार संघात जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. या काळात अनेकदा विधानसभा क्षेत्रातील गावोगावी जात नागरिंकाशी संवाद साधला जातो. त्यांना मतदान करण्यासाठी आवाहन केले जाते.
या प्रचारात अनेक उमेदवारांच्या गाड्यांचा भलामोठा ताफा आपल्याला दिसतो. मात्र, वाई विधानसभेचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी अत्यंत साध्य पद्धतीने प्रचार यंत्रणा राबविली असून, अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न केला आहे. सकाळी ८ वाजल्यापासून जाधव हे प्रचाराला सुरूवात करीत असून, त्यांच्या गावभेट दौऱ्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
आज दि. १३ नोव्हेंबर रोजी जाधव यांनी वाई येथील पूर्व भागातील गावात प्रचार सुरू असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरातूनच आणलेल्या भाकरी कांदा, चटणी व मिरचीच्या झणझणीत खर्ड्यावर त्यांना ताव मारून पुढच्या प्रचाराला आगेकूच केली. वाई पूर्व भागात पुरुषोत्तम जाधव यांना गावोगावी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मतदारांच्या व्यथा ते प्रत्यक्ष पारावर गप्पा मारून समाजावून घेत आहेत. अवास्तव खर्चाला फाटा देऊन पुरुषोत्तम जाधव यांनी सुरू केलेली आगळीवेगळी प्रचार यंत्रणा म्हणजे भांडवलदारासमोर सामान्य कुटुंबातील व्यक्ती अशी ही लढाई पाहायला मिळणार असल्याची चर्चा या विधानसभा क्षेत्रात करण्यात आली आहे.
संधी द्यायला काय हरकत आहे
अपक्ष उमदेवार असलेले पुरषोत्तम जाधव हे मूळातच एका सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांचा साधेपणा तसेच सर्वांशी मिळून मिसळून बोलण्याची पद्धत कोणालाही काही अडचण असल्यास त्याची सोडवणूक करण्याची त्यांची वृत्ती ही मतदारांना भावत असून, जाधव यांना एकवेळ नक्तीच संधी दिली पाहिजे असे येथील मतदार म्हणत आहेत.