साताराः सातरा जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मदन भोसले यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतल्याने मोठी राजकीय घडामोड घडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भोसले यांची घरी जाऊन भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले असून, वाई, खंडाळा, महाबळेश्वरमध्ये अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत शरद पवार असल्याचे बोलले जात आहे.
यामुळे वाई, खंडाळा, महाबळेश्वरमधील भाजपाचा मोठा नेता शरद पवारांच्या गळाला? लागणार असल्याचे देखील बोलले जात आहे. जयंत पाटील आणि मदन भोसले यांची बंददाराआड झालेल्या भेटीनंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे सध्याचे आमदार मकरंद पाटील हे अजित पवारांसोबत गेल्यानंतर शरद पवारांचा मोठा प्लॅन आखला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.