भोरच्या सचिन देशमुखांचा दिल्लीत डंका, आपदा दूत राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
विक्रम शिंदे/कुंदन झांजले: राजगड न्युज
भोर दि.१३ :आलेल्या नैसर्गिक आपत्ती संकटात, आपल्या जीवाची परवा न करता कोणत्याही अनोळखी व्यक्ती, समाज यांच्या मदतीसाठी सदैव झटणा-या आणि आपात्कालीन समयी आपत्ती व्यवस्थापन, शोध -बचाव कार्य, मदत कार्य ,सांघिक टीमबाबत चोख नियोजन, प्रशिक्षण यामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भोरचे सचिन देशमुख यांचा नवी दिल्ली येथे गुरुवार दि १३ राष्ट्रीय आपत्ती निवारण दिवसाचे औचित्य साधून आपदा दूत राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
महाराष्ट्रासह , पुणे जिल्ह्यात सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू फोर्स भोर -पुणे, आपती व्यवस्थापन संघ महाराष्ट्र,रवि सोहम दत्त फौंडेशन भोर व आपत्ती व्यवस्थापण प्रशासन यांच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करून ,शोध ,बचाव आणि मदत कार्य ,अपघात मदत, टीम नियोजन, आपत्तीसाठी टीम तयार करणे आणि नियोजन करणे प्रशिक्षण देणे या कार्याची दखल घेऊन JJS यां राष्ट्रीय संस्था सचिन देशमुख नयांची निवड केली. हा पुरस्कार दिल्ली येथे कॉन्टीशन क्लब ऑफ इंडिया संसद मार्ग येथे दिला आहे यात संपूर्ण भारतातून१४ जणांची निवड केली होती . त्यामध्ये सचिन देशमुख यांचा समावेश आहे. सचिन देशमुख यांच्या उल्लेखनीय कार्याने भोरच्या शिरपेच्यात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आपदा दूत राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने सचिन देशमुख यांच्यावर जिल्ह्यासह, तालुक्यातून प्रचंड कौतुकांचा , अभिनंदनाचा यांचा वर्षाव होत आहे.
तालुक्यात बहुदा पहिल्यांदाच आपत्ती व्यवस्थापनातील राष्ट्रिय पुरस्कार मिळाला असून देशमुख यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.