कुंदन झांजले|राजगड न्युज
भोर:पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे, भोर तालुका विधी समिती यांच्या संयुक्त विदयमाने विद्या प्रतिष्ठाणचे भोर इंग्लीश मेडीयम स्कूल मध्ये उपस्थित विदयार्थ्यांना कायदेवषियक मार्गदर्शन करण्यात आले. सदर कायदेविषयक व्याख्यान मालेमध्ये भोर दिवाणी न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश श्रीमती एन के नागरगोजे व श्रीमती डि ए सरनायक , सह दिवाणी न्यायाधीश यांनी उपस्थीत विद्यार्थ्यांना एकदम सोप्या भाषेत राष्ट्रीय बालिका दिवसाची ओळख करुन दिली. जेष्ठ विधीज्ञ ॲड. तेवर डी. आयझॅक यांनी राष्ट्रीय बालिका दिवस व बालकांचे हक्क व अधिकार यासंबधी कायदेविषयक माहीती दिली.
यावेळी सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.रविका गवंडी यांनी केले प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्राचार्य अश्विनी मादगुडे यांनी केले. सदर कार्यक्रमास ॲड. कमलेश कुलत, ॲड. ओंमकार माने, ॲड.सुर्यवंशी रणवरे, माजी सैनिक सुंदरमुर्ती नायडू तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक महेश जोशी व तालुका विधी सेवा समितीचे लिपीक कैलास आखाडे उपस्थित होते. भाेर इंग्लीश मेडीयम स्कूलचे प्राध्यापक दत्तात्रय महांगरे, निवृत्ती खोपडे, संतोष मादगुडे, सचिन दानवले व इतर नॉन टिचींग स्टाफ हजर होता.
सदर कायदेविषयक कार्यक्रमाचा लाभ २४३ विद्यार्थीनींनी व ३०२ विद्यार्थी अशा एकूण ५४५ विद्यार्थ्यांना मिळाला.