कुंदन झांजले – राजगड न्युज
भोर : भाेर दिवाणी न्यायालय भोर व भोर वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मा. ना. उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशानुसार व मा. जिल्हा न्यायालय, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भाेर दिवाणी न्यायालयातील आवारामध्ये स्वच्छता हीच सेवांतर्गत मोहिमेद्वारे स्वच्छता करण्यात आली .व स्वच्छते विषयी जनजागृती देखील करण्यात आली. यावेळी दिवाणी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्रीमती नेहा नागरगाेजे यांनी स्वच्छते संदर्भात मार्गदर्शन केले.
सदर अभियानामध्ये न्यायालयीन कर्मचारी व वकील सदस्य उपस्थीत राहून सर्वांनी स्वच्छता केली. यामध्ये भाेर वकील संघटनेचे अध्यक्ष मयुर धुमाळ देशमुख, उपाध्यक्ष भगवान गाेगावले, सचिव राकेश काेंडे, जेष्ठ वकील माणिकराव जायगुडे, दिपक चौधरी, त्रिंबक देशमुख, राजश्री बाेरगे, राजेंद्र खाेपडे, विश्वनाथ राेमण, सुरेश शिंदे, दत्तात्रय ऊरुणकर, विक्रम घाेणे व वकील संघटनेचे सदस्य तसेच भाेर नगरपालिकेचे सफाई कर्मचारी देखील उपस्थीत हाेते.