राम पांचाळ : राजगड न्युज
भोर : १ ऑक्टोंबर रोजी किमान १ तास स्वच्छतेसाठी सर्वांनी देण्याचा उपक्रम सर्वत्र तालुक्यातील शहरासह, ग्रामीण भागातून राबविण्यात आला. यावेळी कापूरहोळ येथील सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करून साफसफाई करण्यात आली. यामध्ये ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत श्रमदान केले.
ग्रामपंचायत कापूरहोळ व श्री शिवाजी विद्यालय नसरापुर, भाग शाळा कापूरहोळ व आयडिया फाउंडेशन यांच्या वतीने कापूरहोळ गावामधे व भाग शाळा येथे सच्छता अभियान राबविण्यात आले. गावातील व शालेय परिसरातील कचरा
”गोळा करण्यात आला. ” सरपंच पंकज गाडे,ग्रामसेवक वाकळे विस्तार अधिकारी गुंड , विद्यालयाचे पर्यवेक्षक खोपडे , मालुसरे ,गायकवाड, भोसले ,आकाश गाडे, व’ ‘विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आयडिया फाउंडेशनचे संचालिका और उषा पिल्ले रविकिरण पाटील, सुरज मोहिते आदी विदयार्थी उपस्थित होते
स्मशानभूमी,मंदिर,शाळा परिसर स्वच्छ करून, कचरा व्यवस्थापन योग्य प्रकारे करण्यात आले. यावेळी गावातील महिला, पुरुष, तरूण-तरूणी, ग्रामसेवक व गावातील पदाधिकारी उपस्थित होते. या स्वच्छता मोहिमेद्वारे प्रदूषणाला आळा बसणार असून रोगराई कमी होण्यास मदत होणार आहे.
हि स्वच्छता मोहिम यशस्वी होऊन स्वच्छ, सुजलाम, सुफलाम, कचरामुक्त भारत होईल असे कापूरहोळ गावचे सरपंच पंकज गाडे यांनी बोलताना सांगीतले.