कुंदन झांजले
भोरचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांचा पर्यावरण समृंद्ध उपक्रम
भोर : “कायद्यात रहाल तर, फायद्यात रहाल” हा अजेंडा घेऊन भोरच्या जनतेच्या रक्षणासाठी भोर पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले निसर्गप्रेमी पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या संकल्पनेतून भोर पोलीस स्टेशन आवारात एक हजार वृक्षरोपांची लागवड शुक्रवार (दि२९) उपविभागीय अधिकारी तानाजी बर्डे यांच्या हस्ते करत भोरचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी पर्यावरण पुरक असा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे, पोलीस निरीक्षक शंकर पाटील, उपनिरीक्षक सुप्रिया दुरंगे, गोपनीयचे पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय खेंगरे, उध्दव गायकवाड, विकास लगस, यशवंत शिंदे, शौकत शेख, अजय साळुंके, गणेश कडाळे, अश्विनी जगताप, मंगेश सुर्वे, निलेश साले, होमगार्डचे जवान, शालेय विद्यार्थी व पत्रकार संघ भोरचे व भोर तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते
वन विभागाच्या मदतीने पोलीस स्टेशनं आणि परिसरात आवळा ,चिंच,बोर, कडुनिंब ,वड,पिंपळ,शिसव, कवठ,जांभूळ अशा औषधी निसर्गोपयोगी १००० वृक्षरोपांची लागवड केली व येत्या दोन आठवड्यात पोलीस पाटलांच्या मदतीने तालुक्यात ५००० वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याचे शंकर पाटील यांनी सांगितले.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि निसर्गाचा होणारा ऱ्हास होणारी हानी थांबवण्यासाठी, यासह वन्यप्राण्यांना लाभदायक अशा वृक्षांच वृक्षारोपण करत हि मोहिम राबवत असल्याचेही त्यांनी सांगितले.