खेड शिवापूर: खेड शिवापूर येथील एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या तीसरिच्या विद्यार्थिनीला शिक्षकांकडून मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीमुळे विद्यार्थिनीला किरकोळ जखमा झाल्या आहेत. या घटनेच्या सत्यतेचा “व्हिडिओ व मारहाण झाल्याच्या कबुलीचे ऑडियो” देखील “राजगड न्युज लाईव्हच्या” हाती लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीने वर्गात शिस्तभंग केल्याने दोन शिक्षकांनी तिला बेदम मारहाण केली. व एक दिवसासाठी मुख्याध्यापकांच्या खोली मध्ये डांबून ठेवले, विद्यार्थिनीला गालावर कानावर ,पाठीवर मारण्यात आल्याचे देखील विद्यार्थिनीने सांगितले या मारहाणीमुळे विद्यार्थिनीच्या अंगावर किरकोळ जखमा झाल्या आहेत. तसेच, तिला मानसिक त्रासही सहन करावा लागत असून शिक्षकांच्या भीतीने शाळेमध्ये न जाण्याचा निर्णय विद्यार्थिनीने घेतला आहे.
मारहाणीची माहिती विद्यार्थिनीने शाळा सुटल्या नंतर पालकांना दिली.सदर माहिती मिळताच पालकांनी शाळेत धाव घेतली. मात्र, शिक्षकांनी पालकांनाच दम दिला की, जर त्यांनी या प्रकरणाची तक्रार केली तर त्यांच्या मुलीला शिक्षणासाठी त्रास सहन करावा लागेल.या धमकीमुळे पालक हतबल झाले आहेत. त्यांनी तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात येणार आहे.
या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मारहाण करणे हा अमानुषपणा आहे. अशा घटनांवर तात्काळ लक्ष घालून शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.या प्रकरणात कोणत्या शिक्षकांनी विद्यार्थिनीला मारहाण केली याची माहिती विद्यार्थिनीने पालकांना दिली आहे. त्यांची माहिती मुख्यद्यापक यांना दिल्यावर शिक्षकांवर कारवाई केली जाईल, असे पालकांना मुख्यद्यापक सांगितले आहे.झालेल्या प्रकारात शिक्षकांनी पालकांना धमकी दिल्यामुळे पालकांनी तक्रार करण्यास टाळाटाळ केली. शिक्षकांवर कठोर कारवाई केली जाईल,अशी अपेक्षा इतर पालकांनी व्यक्त केली आहे.
झालेल्या प्रकारात शिक्षकांनी पालकांना धमकी दिल्यामुळे पालकांनी तक्रार करण्यास टाळाटाळ केली. शिक्षकांवर कठोर कारवाई केली जाईल,अशी अपेक्षा इतर पालकांनी व्यक्त केली आहे.
या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मारहाण करणे हा अमानुषपणा आहे. अशा घटनांवर तात्काळ लक्ष घालून शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून होत होती परंतु पालकांना दम देऊन सदर प्रकार मिटविण्यात आले असल्याचे समोर आहे.