भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले
चंद्रपूर येथे दि.१० डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत पार पडलेल्या २५ व्या वरीष्ठ महिला व ६ व्या सब ज्युनियर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये भोरच्या साक्षी बळी हिने ब्रॉन्झ पदक पटकावले. ही स्पर्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मैदान नवजाई ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये विविध वजन गटानुसार ६०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
भोरमधील साक्षी बळी हिने ६९ किलो वजन गटामध्ये सहभाग घेऊन तृतीय क्रमांक पटकावला. त्यावेळी तिला जवाहर कुस्ती संकुलाचे वस्ताद सुनील शेटे यांनी मार्गदर्शन केले तसेच शशिकांत खोपडे, बाबू शेटे ,संतोष शेटे, राहुल शेटे ,सचिन मरगजे यांचे विशेष मार्गदर्शन सहकार्य लाभले. साक्षी ही सध्या जिजामाता विद्यालयात अकरावीत शिकत आहे साक्षीने मिळवलेल्या या यशाचे तालुक्यातून कौतुक होत असून कुस्तीत व इतरही क्रीडा प्रकारात भोरमधील मुलं मुली चमकताना दिसत आहेत.