पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांसाठीच्या अतिरिक्त आयुक्तपदी नगरसचिव उल्हास जगताप यांची निवड करण्यात आली आहे. १९ फेब्रुवारी २०२१ पासून त्यांच्याकडे प्रभारी पदभार होता. आता शासनाने त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले आहे. याबाबतचे आदेश शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी दिले आहेत.
राज्य सरकारने १ सप्टेंबर २०१४ रोजी पिंपरी महापालिकेचा समावेश ‘ब’ वर्गामध्ये केला आहे. ‘ब’ वर्गात समावेश झाल्यामुळे महापालिकेचा नवा आकृतीबंध, सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम तयार केले होते. महापालिकेच्या आकृतिबंधाला राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. (Pimpri News) नवीन आकृतीबंधानुसार महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. त्यातील दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवरचे आणि महापालिका अधिकाऱ्यांकरिता पदोन्नतीसाठी एक याप्रमाणे तीन पदांची विभागणी करण्यात आली. राज्य सेवेतील प्रदीप जांभळे आणि विजय खोराटे हे दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवरील आहेत. महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे १९ फेब्रुवारी २०२१ पासून अतिरिक्त आयुक्तपदाचा प्रभारी पदभार आहे.