दत्तात्रय कोंडे| राजगड न्युज लाइव्ह
खेड शिवापूर : शिवापुर वाडा ता.हवेली जि. येथील चौकात सराफाचे 6 लाख 58 हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लांबविल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी तीन अज्ञात व्यक्ती विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार दि. 5 रोजी शिवापुर वाडा ता.हवेली जि. पुणे येथील बसस्टॉप जवळ रोडवर सोनार व्यावसायिकाची अनोळखी तीन मुलांनी अडवुन तोंडावर स्प्रे मारून सायकलला लटकवलेली पिशवी त्यामध्ये सुमारे 6 लाख 58 हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले आहेत.या बाबत यशवंत राजाराम महामुनी वय 46 वर्षे धंदा- सोनार रा. शिवापुर ता.हवेली जि. पुणे. यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तीन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ करीत आहेत.