सर्वगुण संपन्न.. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पोपटराव (बाबा) नारायण सुके !
अष्टपैलू व्यक्तिमत्व सर्वगुणसंपन्न भोर तालुक्यातील खेडेगावातील निगडे गावातील एक उमदा नेतृत्व प्रखर असा पद्धतीने ठसा उमटविलेला अनेक पदानी पदाभूषण असलेले सहकार महर्षी प्रगतशील शेतकरी प्रसिद्ध उद्योजक व राजगड कारखान्याचे विद्यमान व्हाइस चेरमन पोपटराव नारायण सुके यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या कार्य शिलतेवर टाकलेला प्रकाश मी अनुभवलेले माझे मार्गदर्शक….सुके साहेब..
भोर तालुक्याच्या राजकारणातील, उमदे नेतृत्व, लखलखता तारा, राजगड सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेरमन, नवसह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, हजारो लोकांसाठी रोजगार निर्माण करणारे पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक, शिक्षण सम्राट, तरुणांचे मार्गदर्शक, आधारस्तंभ पोपटराव सुके साहे बांचे वर्णन करायला खरं तर शब्द अपुरे पडतात. कारण त्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू आहे.
पोपटराव सुके यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९६४ साली भोर तालुक्यातील निगडे या खेडेगावा त झाला.त्याचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले तर व्यावसायिक प्रशिक्षण पुणे येथे झाले. पोपटराव सुके यांनी मित्रांच्या सह कार्याने भरपूर मेहनत आणि प्रयत्नांची परा काष्ठा करून भाडेतत्वाने घेतलेल्याछोट्याशा खोलीत व्यवसायाची सुरुवात केली व्यवसा यासाठी अठरा-अठरा तास कष्ट करायला सुरुवात केली. या छोट्याशा व्यवसायामध्ये त्यांनी नियोजनपूर्वक काळानुरूप बदल करून आधुनिकता आणली. व्यवसायाचा व्याप सांभाळताना, आपण समाजाचे देणे लागतो, ही सामाजिक जाणीव त्यांनी कायम ठेवली. .
पोपटराव सुके यांनी नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ची स्थापना केली. यामाध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण सहज उपलब्ध व्हावे, यासाठीइंजिनि अरिंग कॉलेजची स्थापना केली तसेच मॅने जमेंटचे कोर्सेस चालू केले व यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमी वेळेत कमी खर्चामध्ये व्यावसायिक शिक्षण देण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला व आज ‘नवसह्याद्री एज्युकेशन सोसायटी’ चा फार्मसी इंजीनिय रिंग एमबीए पॉलीटेक्निक,तसेच लहान मुलां चे इंग्लिश मीडियम जुनिअर कॉलेज असा विस्तार झाला आहे.
समाजकारण व राजकारण करत असताना पोपटराव सुके यांनी नव सह्याद्री एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा जो पाया रचला आहे. जो महायज्ञ सुरू केला आहे. यामध्ये कधीच राजकारण आणले नाही. त्या चबरोबर या पवित्र ज्ञानयज्ञात आज पर्यंत कधीच खंड पडू दिला नाही.
शांत, संयमी, परखड, आपुलकी, सभ्यता, निस्वार्थीपणा आणि दिलदारपणा यामुळे पोपटरावांच्या भोवती मित्र-परिवाराचे मोह ळच जोडले गेले आहे. भोर सारख्या ग्रामीण व पुण्या सारख्या शहरी राजकारणाचा विचा र करता सर्वसामान्य नागरिक पोपटरावांकडे एक संवेदनशील मनाचे, उमद्ये व सुशिक्षित नेतृत्व म्हणून पहातात.
पोपटराव (बाबांचा) आज जन्मदिवस या आनंदी दिवसाची सुरुवात भोरतालुक्यातील व पुणे शहरतील तुमच्या वर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते, आप्तेष्ट, मित्र परिवार यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला असेल. आप णास वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मला खरोखरच मनोमन आनंद वाटतो आहे. आपल्या सारख्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वा पासून तरुणांना सदैव प्रेरणा मिळावी, आपणास पुढील भावी वाटचालीसाठी सुयश चिंतीत असताना आपणांस व आपल्या परिवारास नेहमीच सूख, समाधान व उत्तम, निरोगी व दिर्घ आरोग्य लाभो… हिच ईश्वर चरणी विनम्र प्रार्थना…!
शब्दांकन : जीवन सोनवणे