दत्तात्रय कोंडे:राजगड न्युज
खेड शिवापूर दि.14 :- खेड शिवापूर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून एक गाव एक देवी उत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असतो. यामध्ये शिवापूर, श्रीरामनगर, तसेच सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कोंढणपूर येथे (हेमाडपंथी मंदिर) “एक गाव एक देवी” उत्सवाचे दर्शन घडते. तसेच काही गावातही असे उपक्रम राबविण्यात येत असून नवरात्रौत्सवासाठी जय्यत तयारी पूर्णत्वास आली आहे.
मंदिर परिसरात सभा मंडप, भक्तांना ऊन, पावसाचा त्रास होऊ नये यासाठी दर्शन रांगा उभारून त्यावर पत्र्याचे शेड उभारले आहेत. नऊ दिवस विविध प्रकारच्या खेळामधून अनेक प्रकारची महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी बक्षिसांची खैरात ठेवण्यात आली आहे.
शिवापूर येथील दुर्गादेवी, श्रीरामनगरची दुर्गामाता, कल्याणची करणंजाई माता, शिंदेवाडीची वाघजाई माता, रांजे येथील काळूबाई आदी ठिकाणी जोरदार तयारी पूर्णत्वास येताना दिसून येत आहे.