बाळू शिंदे : राजगड न्युज
कापूरहोळ दि: १३: भोर तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला कापूरव्होळ भोर- मांढरदेवी वाई या काँक्रीट रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून सुमारे ३४० कोटींचा निधी खर्ची पडनार आहे. रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन एम.एस औताडे कंपनीकडून सदर रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
कापूरहोळ ते भोर दरम्यान जागोजागी रस्ता उकरून मोऱ्या टाकण्याचे काम प्रगतीथावर आहे. तर रस्ता उकरुण मुरूम भरला आहे.गेली सात ते आठ दिवस मुरूम रोलींग केला जात असताना त्यावर पाणी वापर केला जात नाही त्यामुळे प्रचंड धुरुळा उडत असून दुचाकी व चार चाकी वाहन चालक व प्रवाशी याना प्रचंड त्रास होत आहे. तर रस्ता खड्डेमय झाला असून वाहणाचे नुकसान होत आहे तसेच रस्ता उकरलेल्या ठिकाणी अपघात होवुनये म्हणून पुरेशी काळजी घेतली जात नाही.त्यामुळे दुचाकी स्वार रात्री अपरात्री खड्यात पडून अपघात होत आहेत.
भोर-कापूरव्होळ रस्ता अत्यंत अरुंद असून रस्त्यावर वेडीवाकडी वळणे आहेत.ठीक ठिकाणी रस्ता तीव्र उताराचा अरुंद आणि बायपास केलेला खड्डेमय असून प्रवास करण्यास धोकादायक झाला आहे. तसेच ठेकेदाराने धुरूळा उडूनये म्हणून पाणी मारण्याची व्यवस्था केली नाही.
कापूरहोळ ते वाई या ५४.८८ किलोमीटर किमी लांबीच्या रस्त्याचे काम करताना ठेकेदाराने वहातुक विनात्रास सुरू राहील याची काळजी घेणे गरजेचे आहे. नाही तर रस्त्याचे काम होताना नागरिकांना आपला जीव गमवावा लागेल त्यामुळे नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करताना स्वतः काळजी घेणे गरजेचे आहे.